श्री हनुमंताची आरती | Shri Hanuman Aarti in Marathi

Spread the love

श्री हनुमान आरती Lyrics (Shri Hanuman Aarti lyrics in Marathi)

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।।

तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

जय देवा हनुमंता हनुमान आरती

जय देवा हनुमंता । जय अंजनी सुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ धृ. ॥

वानररुपधारी । ज्याची अंजनी माता ॥
हिंडती वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ।
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिलीं कथा ॥ १ ॥

सीतेच्या शोधासाठीं । रामें दिधली आज्ञा ॥
उल्लंघुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ।
शोधूनी अशोकवना। मुद्रा टाकिलि खुणा ॥ २ ॥

सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिलें । मारिला अखया दारूण ॥
परतोनी लंकेदरी । तंव केले दहन ॥ ३ ॥

निजवळें इंद्रजित । होम करीं आपण ॥
तोही त्वां विध्वंसिला लघुशंका करून ।
देखोनी पळताती ॥ महाभूतें दारूण ॥ ४ ॥

राम हो लक्षुमण । जरी पाताळीं नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेशे केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजीं मर्दिले ॥ ५ ॥

देउनि भुभु:कार । नरलोक आटीले ॥
दीनानाथा माहेरा त्वां ॥ स्वामिसी सोडविले ॥
घेऊनि स्वामी खांदी । अयोध्येसी आणिलें ॥ ६ ॥

हनुमंत नाम तुझें । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वठायी । हारोहारीं अंबरा ॥
एका जनार्दनीं ॥ मुक्त झाले संसारा ॥ ७ ॥

अघटित भीमपराक्रम जय जय हनुमंता आरती

अघटित भीमपराक्रम जय जय हनुमंता ।
अंजनिबालक म्हणविसी अपणा बलवंता ॥
उपजत किलाणमात्रें आक्रमिसी सविता ।
रावण गर्वनिकंद कपिबलयदातां ॥ १ ॥

जय देव जय देव जय मारूतीराया ब्रह्मासुखामृतसागर वंदित मी सदया ॥ धृ. ॥

दुर्घटसागर उडोनी सीतेची शुद्धी ।
मर्दुनी जंबूमाळी करिसी सद्‌बुद्धी ॥
भवलंकापुर जाळुनि नावरसी युद्धीं ।
रघुपतिनिजकार्याची करिसी तूं शुद्धी ॥ जय. ॥ २ ॥

जिंकिसी विषयसमुद्रा पवनात्मज रुद्रा ।
निजजनदु:खदरिद्रा पळविसी तूं भद्रा ॥
कपिकुलमंडणचंद्रा हरिं हे जडचंद्रा ।
सुखकर यतिवर वंदित मौनी पदमुद्रा ॥ जय. ॥ ३ ॥

हनुमंता आरती

माया शोधाविषयीं तरलासि समुद्रा ।
मध्यें भयंकरीला करिसी ह्रच्छिद्रा ॥
नमुनि श्रीला देसी दशरथीमुद्रा ।
लंका जाळूनि येसी एकादशरुद्रा ॥ १ ॥

जय देव जय देव जय मारुतिराया ।
जगदुद्धार कराया येसी या ठाया ॥ धृ. ॥
रुदन करी राम तया बहुसुखिया केला ।
सेतू बांधुनि सकपी नेशी लंकेला ॥
दशवदनदिक मारुनि आणिलि सीतेला ।
दासा बिभीषणाला लंकापति केला ॥ जय. ॥ २ ॥

ती कीर्ति तव अतुला वर्णिल कोण जनी ।
तरले दु:खसमुद्री बहू नर तव भजनीं ॥
सत्वर पावसी ऎसें कथिलेंसे सुजनीं ।
तव दर्शनवियोगे निरसे भ्रम रजनीं ॥ जय. ॥ ३ ॥

राहावें ममह्रुदयी सदया कपिराया ।
अखिलहि अधिव्याधी निर्मुल कराया ॥
मन्मन निर्मल व्हावें निस्पृह विचाराया ।
न जसा विलंब उदकी लवणास विराया ॥ जय. ॥ ४ ॥

या देही या नयनीं ब्रह्मचि खेंळावे ।
ज्ञानाग्नीनें संचित सर्वहि जाळावें ॥
क्रियामाणहि बाधेना ऎसे बाळावे ॥
नारायणदासा तव चरणीं पाळावें ॥ जय ॥ ५ ॥

मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

सुखि निद्रा करी आतां स्वामि बलभीमा श्रीगुरु स्वामी बलमीना जालीसे बहु निशि आतां ध्यावें विश्रामा ॥धृ॥ देवा ॥

सीतेच्या शोधासि केलें लंकेसी जाण ।
मारुनि जंबूमाळी केले रावणदंडण ॥ देवा ॥
लीलामात्रें पुच्छालागीं अग्नि लावून ।
अर्धक्षणामाझारि केलें लंकेचें दहन ॥१॥

समुद्राच्या वरुते वेगि बांधुनि सेतूला ।
दशकंधरपुरिवरुते जाउनि चढविला हल्ला ॥ देवा ॥
लक्ष्मणाच्या साठीं उचलुनि द्रोणाचळ नेला ।
रामाचें निजसाह्य करुनिया विजयो मेळविला ॥ देवा ॥॥ २ ॥

जाउनिया पाताळीं लोटुनि दिधलें देवीला ।
महिरावण घेउनिया पायाखालीं रगडीला ॥ देवा ॥
निरंजन विलासि रघुविर संतुष्ट केला ।
कीर्ती जयजयकार तुमचा त्रैलोकीं जाला ॥ देवा ॥३॥

जयजय हनुमंता मारुतीच्या आरत्या

जयदेवजयदेव जयजय हनुमंता । आरति ओवाळू तुज वायु सुता ॥धृ॥
अंजनीच्या उदरीं प्रगटुनिया जाण ।
उन्मतांचि क्षणीं केलें उड्डाण ।
स्पर्शुनिया रविमंडळ जालें से येण ।
अगाध तवगुणमहिमा न कळे विंदान ॥१॥

दशरथतनुजाची तनु होतां विखंडा ।
द्रोणाचळ उचलुनिया नेता प्रचंडा ।
मार्गीं सहजीं त्याचा पडलासे गुंडा ।
तो हा पृथ्वीवरुते शोभे जरांडा ॥२॥

रघुवीराचे चरणीं ठेवुनीया प्रीती ।
त्रैलोक्याचे ठायीं वाढवीली ख्याती ॥
सद्भावें नीरंजन करितो आरती ।
पूर्णकटाक्षें ईक्षण करि त्याच्या वरुती ॥३॥

हनुमान आरती

जय जय बलभीमा बलभीमा । अगाध तवगुण – महिमा ॥धृ॥
वंदुनिया श्रीरामा केली । निजबळ तूं बळसीमा ॥१॥
सीताशोक निवारून । केले लंकापुरिच्या दहना ॥२॥
द्रोणाचळ गिरि अणिला । बंधु लक्ष्मण वांचंविला ॥३॥
निरंजन तवपायीं । भावें ठेवित येउनि डोई ॥४॥

जयदेव जय अंजनितनया आरती

जयदेव जयदेव जय अंजनितनया ॥
आरति बोवाळूं तुज करुणानि लया ॥ध्रु०॥
अभिवन प्रतापमहिमा न बोलवे वाणी ॥
फळ म्हणवुनियां धरिला बाळपणीं तरणी ॥
अहिरावण महिरावण मारुनिया दोनी ॥
आणिला रघुविर केली अघटित हे करणी ॥१॥

शत योजन एका उडुअणें उदधी ॥
लंघुनि क्रौंचा वधिलें अगणीत बळबुद्धी ॥
लंकाप्रवेश करुनी दशमुख अतिक्रोधी ॥
राक्षस गांजुनि केली त्वां सीताशुद्धी ॥२॥

अशोकवन विध्वंसुनि वनचर निर्दळिले ॥
लंका जाळुनि पुच्छें रजनीचर छळिले ॥
श्रीरामासह सैन्य कपिगण तोषविले ॥
म्हणती भीम पराक्रम हनुमंतें केले ॥३॥

रामानुजसह सेने शक्ती लागतां ॥
द्रोणागिरि आणिला तो रवि-उदय नव्हतां ॥
अमृतसंजीवनी देउनियां त्वरितां ॥
संतोषविले दशरथसुतमहिजा-कांता ॥४॥

महारुद्रा हनुमंता देवा बलभीमा ॥
प्रियकर दास्यत्वें तूं होसी श्रीरामा ॥
शिव शंकर अवतारी निस्सीम सीमा ॥
नि:संगा निजरंगा मुनिमनविश्रामा ॥५॥

कोटीच्या ही कोटी गगनीं उडाला मारुतीच्या आरत्या

कोटीच्या ही कोटी गगनीं उडाला ।
अचपळ चंचल द्रोणाचळ घेउनि आला ॥
आला गेला आला कामा बहुतांला ।
वानर कटका चुटका लावुनियां गेलां ॥ १ ॥

जय देव जय देव जयजी बलभीमा ।
आरती ओवाळूं सुंदर गुणसीमा ॥ धृ. ॥
उत्कटबळ तें तुंबळ खळबळली सेना ।
चळवळ करितां त्यासी तुळणा दीसेना ॥
उदंड किर्ती तेथें मन हें बैसेना ।
दास म्हणे न कळे मोठा कीं साना ॥ २ ॥

श्री हनुमान आरती

जय जय अंजनिबाला । पंचारति ही करितों तुजला ॥ धृ. ॥
सीताशुद्धिस्तव जावोनी ॥ जाळीली लंका ।

दुष्ट वधोनी ॥ जानकिसह रामाला ।
नेसी अयोद्धे सुखधामाला ॥ जय. ॥ १ ॥

चरणी शरण मी भावें आलो । ब्रह्म सदोदित ह्र्दयी खेळो ॥
ऐशा दे ज्ञानाला । धन्य करी या बलवत्कविला ॥ जय. ॥ २ ॥

जयजय श्रीबलभीमा हनुमान आरती

जयजय श्रीबलभीमा , मारुति अंजनिच्या नंदना हो ।
राक्षसकुळ हानना, अनाथनाथा करुणाघना हो ॥धृ०॥

सीता विरहें दुःखित, सीता सीता आक्रंदत हो ।
पंपातीर्थ तटाकिं, रघुविर पाहिला अवचित हो ।
तो प्रभु सद्‌गुरु केला, भावें होऊनि शरणांगत हो ।
निश्‍चय पण आदरिला, सीता शुद्धीचा संकेत हो ।
दक्षिणपंथें उडाला, टाकुनि मागें प्रभंजना हो ॥जय० ॥१॥

शोध सितेचा केला, क्रोधें जाळुनि लंकापुर हो ।
रामेश्‍वर लिंगापुढें, जाणों लाविला कापूर हो ।
राक्षस वधितां वहाती, तद्रक्‍ताचे तुंबळ पुर हो ।
नादें अंबर गर्जे, बहु भय वाटे दिग्गज मना हो ॥जय० ॥२॥

क्षणमात्रें शतकोटी, पर्वत उपडी बाहूबळें हो ।
फाटे धरणी तटाटे, हालवी ब्रह्मांड लांगुलें हो ।
राक्षस म्हणती भक्षक शिक्षक झाली गोलांगुलें हो ।
आत्मा कुलक्षय पाहुनि, रावण मोडित शत अंगुलें हो ।
प्राणमित्र म्हणे टाकुनि, अहिमहि गेले यमसदना हो ॥जय ३॥

पडतां रणिं लक्षूमण, वेगें द्रोणागिरी आणिला हो ।
चार वेळ रात्रींतून, गेला आला गेला अला हो ।
सीता हरतां मरतां, भरतां सरतां जय पावला हो ।
राम सिता सौमित्रा मारुति सप्राण भावला हो ।
भवबाधेची तोडी, विष्णूदासाची कल्पना हो ॥जय० ४॥

जयजय महावीर धीर चिरंजिव मारुती आरती

जयजय महावीर धीर चिरंजिव, मारुती बलभीमा ।
जनकसुता-भय-शोक-निवारण,कपिगण-विश्रामा ।
दशकंधर पुर दाहक प्रियकर, दाशरथी रामा ॥जयजय॥धृ.॥

जन्मतांचि पुढें नवल देखिलें, रक्‍तवर्ण नयनीं ।
बाळ क्षुधित तें फळ म्हणुनि बळें, झेंपावें गगनीं ।
ग्रहणकाळ खग्रास केतुवत, रवि घालि वदनीं ।
समर करुनि अरि अमर भासिले, करितां संग्रामा ॥जय० १॥

कडाडिलें ब्रह्मांड झोकितां, क्रोधें उड्‌डाण ।
क्षणमात्रें तळ मुळ उत्पाटुन, आणिला गिरि द्रोण ।
लक्ष्मणासह मृत रणकपिचा, जीवविला प्राण ।
खळ राक्षसकुळ सकळ धाडिलें, रविनंदन-धामा ॥जय० २॥

वज्रतनू घनशाम विराजे, तेज प्रखर तरणी ।
अटिव जेठि निट कटि कासूटी, कुंडलेंदु करणी ।
मुगुट गळा हार भार डोलती, नुपुर द्वय चरणीं ।
सजल नयन पुट जलज वदन शशि, सज्जन सप्रेमा ॥जय० ३॥

दुर्घट संकटें कोटि लोपतीं, देतां बुभुःक्कार ।
करुणासागर नत जनिं वागवि, ब्रीद अहंकार ।
विष्णुदास कर जोडुनि नमना, करि वारंवार ।
चरण गुणार्णव अगणित वर्णन, न कळे तव सीमा ॥जय० ४॥

श्री हनुमान आरती | Shri Hanuman Aarti in Marathi PDF

Also Download Shri Hanuman Aarti PDF in Other Languages 

श्री हनुमानाची आरती | Shri Hanuman Aarti Video in Marathi with Lyrics

The Significance Of Hanuman Aarti in Marathi

भगवान हनुमान हे हिंदू धर्मातील एक पूज्य देवता आहे जे त्यांच्या अटल भक्तीसाठी आणि अतुलनीय सामर्थ्यासाठी ओळखले जाते. विशेषत: हनुमान जयंतीच्या उत्सवादरम्यान संरक्षक आणि संरक्षक देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. भगवान हनुमानाची मराठी मध्ये सर्वात प्रसिद्ध आरती म्हणजे “सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी,” जी विविध प्रसंगी गायली जाते. आरतीचे बोल भगवान हनुमानाच्या गुणांची आणि कर्तृत्वाची स्तुती करतात.

Lord Hanuman is a revered deity in Hinduism known for his unwavering devotion and incredible strength. He is worshipped as a protector and guardian deity, especially during the festival of Hanuman Jayanti. Lord Hanuman’s most famous aarti in Marathi is “Satranen Udaanen Hunkar Vadani”, which is sung on various occasions. The words in the aarti praise Lord Hanuman’s qualities and actions.

भगवान हनुमान हे हिंदू धर्मातील आदरणीय देवता आणि आहेत भगवान विष्णूच्या प्रमुख अवतारांपैकी एक असलेल्या भगवान रामाची अटल भक्ती, अतुलनीय शक्ती आणि निःस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाणारे ते एक दैवी व्यक्तिमत्त्व आहे. हनुमानाला अनेकदा माकडाच्या चेहऱ्याचे देवता म्हणून चित्रित केले जाते आणि त्याला अंजनेय, मारुती, बजरंगबली आणि इतर नावांनी देखील ओळखले जाते.भगवान हनुमान हे संरक्षक आणि संरक्षक देवता मानले जातात.

Lord Hanuman is a revered god in Hinduism and is a divine personality known for his unwavering devotion, unparalleled strength and selfless service to Lord Rama, one of the principal incarnations of Lord Vishnu.
Hanuman is often depicted as a monkey-faced deity, and he is also known as Anjaneya, Maruti, Bajrangbali, and other names.Lord Hanuman is considered a protector and guardian deity.